

-rat१८p११.jpg-
P२५N५१९३२
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात मार्गदर्शन करताना उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड.
---
तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना शुभेच्छा
देव, घैसास, कीर महाविद्यालयात समारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभाग व आयक्युएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित केला.
जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःबरोबरच महाविद्यालयाचे व पालकांचे नाव उज्ज्वल व उंच करा, असा सल्ला दिला. प्रास्ताविक परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी केले. तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिन्ही शाखांच्या वर्गशिक्षकांनी व उपप्राचार्या वसुंधरा जाधव यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून महाविद्यालयाला माईक व स्पीकर भेटवस्तू स्वरूपात दिला. सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमिषा मडके व ईश्वरी पवार यांनी केले. आकाश रनसे याने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.