

-rat१८p३.jpg-
२५N५१९३५
शिवसृष्टीचे लोकार्पण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. सोबत उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी सिंह, पोलिस अधीक्षक कुलकर्णी, पदाधिकारी आदी.
----------
शिवसृष्टी पाहून डोळ्याचे पारणे फिटले
अजित पवार ः भव्यदिव्य छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : कसबा (ता. संगमेश्वर) येथे काहींनी केलेली गद्दारी, फितुरीमुळे औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले नंतर ज्या पद्धतीने त्यांना त्रास देण्यात आला ते तिथं बोलता पण येत नाही. अशा धाडसी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक येथे उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला स्मारक पाहून अभिमान आणि जगाला हेवा वाटेल, अशा सुंदर पद्धतीने स्मारकाची उभारणी केली जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पेठकिल्ला येथील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे एकमेव कारण त्यांचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीला लक्षात राहिला पाहिजे. इतिहास काय असतो, राजा कसा असावा, तो रयतेचा राजा, सर्व जातीधर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता. जातीय सलोखा कसा नांदवत होता आणि कशा पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सगळ्या घटकांना बरोबर घेऊन पुढे जात होता. याचा एक आदर्श छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केला होता. ते पुढील पिढ्यांना समजले पाहिजे यासाठी स्मारक भव्यदिव्य स्वरूपात उभारण्यात येणार आहे.
मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरवात करत असताना अनेक तरुणांना संधी दिली. त्यामध्ये मी उदय सामंत यांना पण तरुणपणामध्ये संधी दिली. ते पक्षाचे युवकचे अध्यक्ष झाले. त्यानंतर येथील लोकप्रतिनिधी झाले. त्याच्यानंतर एक एक टप्पा गाठत रत्नागिरी जिल्हा असेल. राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतले. ते यशस्वी करून दाखवले, अशा शब्दात उदय सामंत यांचे कौतुक केले.
------
कोट
रत्नागिरीत आम्ही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतोय, अशा विविध उपक्रमांना आपण फार मोठा निधी अर्थमंत्री म्हणून तुम्ही उपलब्ध करून द्याल, ही देखील खात्री आहे.
-उदय सामंत, उद्योगमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.