रत्नागिरीत ठाकरे सेनेला पुन्हा धक्का

रत्नागिरीत ठाकरे सेनेला पुन्हा धक्का
Published on

-rat१८p१३.jpg-
२५N५१९४३
मुंबई : ठाकरे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याप्रसंगी त्यांचे स्वागत करताना कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राजेश सावंत, दादा दळी, विवेक सुर्वे आदी.
---
रत्नागिरीत ठाकरे सेनेला पुन्हा धक्का
भाजपमध्ये उपतालुकाप्रमुख, बाजार समिती संचालक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून ठाकरेंची साथ अनेकजण सोडू लागले असून, ते शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये जाऊ लागले आहेत. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपला मोर्चा रत्नागिरीकडे वळवला आणि ठाकरे शिवसेनेतील बड्या नेत्यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला.
प्रवेशकर्त्यांमध्ये शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश साळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप सुर्वे व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुखांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आज या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला.
शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश साळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप सुर्वे (नाचणे), रत्नागिरी शहर वॉर्ड क्र. ५ चे शाखाप्रमुख दीपक गावडे, वॉर्ड क्र. ६ चे शाखाप्रमुख दत्ता घडशी, नाचणे उपविभागप्रमुख दिनेश रिमुलकर, सचिव दीपक सुपल, श्रीकांत घनवटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष (दक्षिण) दादा दळी, तालुकाध्यक्ष (उत्तर) विवेक सुर्वे, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष (उत्तर) प्रतीक देसाई, युवानेते तथा चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com