

51954
व्यापक वाचन चळवळीसाठी जिल्ह्यात होणार ‘ई-ग्रंथालये’
मनीष दळवी : डिजिटल क्रांतीला साजेशी पालकमंत्र्यांची पावले
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः ‘‘साहित्य आणि वाचन चळवळ अधिक व्यापक व्हावी, याकरिता पालकमंत्री नीतेश राणे यांनी डिजिटलच्या माध्यमातून ‘ई-ग्रंथालय’ उभारण्यासाठी पावले उचलली आहेत,’’ अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सावंतवाडी शाखेतर्फे कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन शनिवारी (ता. २२) होत आहे. प्रमुख पाहुणे श्री. दळवी यांना निमंत्रित करण्यासाठी आज त्यांची भेट घेतली असता त्यांनी ‘ई ग्रंथालयां’बाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी अध्यक्ष व जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक अॅड. संतोष सावंत, ‘कोमसाप’ जिल्हा खजिनदार, जिल्हा ग्रंथालय संचालक भरत गावडे, सावंतवाडी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे आदी उपस्थित होते.
‘‘डिजिटल क्रांतीला साजेशी ‘ई-ग्रंथालय’ उभी राहिली पाहिजेत, यासाठी पालकमंत्री राणे यांनी पावले उचलली आहेत. सर्वप्रथम जिल्हा मुख्यालय ओरोस येथील ग्रंथालय ‘ई-ग्रंथालय’ बनविले जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील अन्य ग्रंथालयांची ‘ई-ग्रंथालय’ साखळी निर्माण करण्याचे धोरण पालकमंत्री राणे यांनी आखले आहे,’’ असे श्री. दळवी यांनी सांगितले.
---
‘पाच वर्षांतच चित्र स्पष्ट’
श्री. दळवी म्हणाले, ‘‘पालकमंत्री राणे यांनी खासकरून जिल्ह्यातील सर्व ग्रंथालये संगणकीकृत करून ‘ई-ग्रंथालय’ करण्याचा संकल्प केला आहे. येत्या पाच वर्षांत हे सर्व होणार आहे. सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा ग्रंथालय ‘ई-ग्रंथालय’ केल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील ग्रंथालये जोडली जाणार आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.