गोळप पूर-पावस रस्त्यांची दूरवस्था

गोळप पूर-पावस रस्त्यांची दूरवस्था
Published on

गोळप पूल-पावस रस्त्यांची दुरवस्था
काँक्रिट रस्त्याचे आश्वासन हवेत; वाहनचालकांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १८ ः गोळप पूल ते पावस बाजारपेठमार्गे पावस चौकदरम्यान वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून हा रस्ता सिमेंट काँक्रिट करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीमध्ये देण्यात आले होते; मात्र हे आश्वासन हवेत विरले आहे.
हा रस्ता गेली अनेक वर्षे अरूंद व खड्डेमय असल्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होते. त्याला पर्याय म्हणून बायपास रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक कमी झाली. तसेच अरूंद रस्त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूकही बंद झाली. त्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेला बसला आहे. अरूंद रस्त्यामुळे व रस्त्याला गटारे नसल्याने दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडतात. ते तात्पुरत्या स्वरूपात बुजवले जातात. दोन-तीन वर्षानंतर रस्त्याचे डांबरीकरण केले जाते; परंतु गटार नसल्याने दरवर्षी खड्ड्यांचे प्रमाण वाढत असते. त्यावर उपाय म्हणून बाजारपेठ मार्गावरील संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करावा आणि दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांवर पर्याय शोधावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींना करण्यात आली. विधानसभा निवडणूक प्रचारांमध्ये या मार्गावर सिमेंट काँक्रिटचा रस्ता मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे; मात्र आचारसंहिता असल्याने त्यावर सध्या काम करता येत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने काँक्रिटचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते; परंतु निवडणुकीत दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाही.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे म्हणाले, या मार्गावर बायपास झाला असला तरी बाजारपेठमार्गे रस्ता सर्वांना जवळचा व सोयीचा आहे; मात्र त्या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात. त्यावर तात्पुरती उपाययोजना केली जाते; परंतु ठोस कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना हा रस्ता सध्या त्रासदायक ठरत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन पुरे केल्यास हा रस्ता सर्वांना सुखकारक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com