सोनुर्लीत २२ पासून सांस्कृतिक कार्यक्रम

सोनुर्लीत २२ पासून सांस्कृतिक कार्यक्रम
Published on

सोनुर्लीत २२ पासून
सांस्कृतिक कार्यक्रम
सावंतवाडीः नवयुवक कला-क्रीडा मंडळ, सोनुर्ली पाक्याचीवाडी यांच्या वतीने सोनुर्ली हायस्कूलनजीक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २२) सायंकाळी ८.३० वाजता अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ, निरवडे यांचा नाट्यप्रयोग, रविवारी (ता. २३) सायंकाळी ८.३० वाजता डबलबारी भजनाचा सामना कोटेश्वर नवतरुण भजन मंडळ, हरकुळ बुद्रुकचे (कणकवली) बुवा अभिषेक शिरसाट व लिंगेश्वर भजन मंडळ, पोखरण-कुडाळचे बुवा समीर कदम यांच्यात होणार आहे. बुवा शिरसाट यांना पखवाज साथ रुपेश परब, तबला साथ अभिषेक सुतार करतील. समीर कदम यांना पखवाज साथ ओंकार दुखंडे व तबला साथ भावेश लाड करतील.
...................
वेंगुर्लेत शुक्रवारपासून
अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा
वेंगुर्लेः श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ म्हाडा आयोजित व वेंगुर्ले शहर शिवसेना पुरस्कृत भगवा चषक नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. वेंगुर्ले कॅम्प येथील म्हाडा वसाहतीत आयोजित केलेली ही स्पर्धा २१, २२ व २३ मार्चला रात्रीची खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला १७,७७७, उपविजेत्या संघाला ११,१११, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी ३३३३ रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्या संघाला भगव्या चषकानेही सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर आदी पारितोषिकेही देण्यात येतील. या स्पर्धेत मठ, वडखोल, वेंगुर्ले शहर, अणसूर नाका, भेंडमळा, आडारी, मूठ, उभादांडा, बागायतवाडी, दाभोसवाडा, नवाबाग, भटवाडी येथील संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रथम येणाऱ्या २० संघांना स्पर्धेसाठी प्रवेश देण्यात येईल. नाव नोंदणीसाठी सदानंद मुळे यांच्याशी संपर्क साधावा.
......
कोंडुरा कर्णबधिर
शाळेत खाऊ वाटप
सावंतवाडीः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ वा वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. १६) कोंडुरा गावातील कर्णबधीर शाळेतील मतिमंद मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी शिक्षकांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांची विचारपूस केली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांची ओळख करून दिली. सावंतवाडी संपर्क अध्यक्ष अमित नाईक यांनी सर्वांना मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित शिक्षक व मनसे पदाधिकारी विभाग अध्यक्ष राकेश परब, गौरेश पालयेकर, बाबू गोडकर, संतोष गोडकर, चिन्मय नाडकर्णी, आत्माराम बांदेकर, सचिन पांगम यांनी मुलांना खाऊ वाटप करून वर्धापन दिन साजरा केला.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com