हत्ती बाधित शेतकरी कर्नाटक दौऱ्यावर

हत्ती बाधित शेतकरी कर्नाटक दौऱ्यावर
Published on

52007

हत्ती बाधित शेतकरी कर्नाटक दौऱ्यावर

अभ्यास मोहीम ः वनविभागाच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ : हत्ती बाधित तिलारी खोऱ्यातील शेतकरी, ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग व दोडामार्ग वन विभागाने कर्नाटकात आयोजित केलेल्या हत्ती पकड मोहिमेच्या भागाची पाहणी करण्यासाठीचा दौरा आज सुरू झाला. कर्नाटकातील हसन या ठिकाणी हे शेतकरी, ग्रामस्थ सिंधुदुर्ग व दोडामार्ग वनविभागातील अधिकारी, पत्रकार आज रवाना झाले.
गेल्या काही महिन्यांपासून रानटी हत्तींचा उपद्रव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर या हत्तींना पकडण्यासाठीची मोहीम शासनाने राबवावी, अशी मागणी तिलारी खोऱ्यातील हत्ती बाधित गावागावांमधून होत होती. अलीकडे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी उपोषणादरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या कर्नाटकातील हत्ती पकड मोहिमेकडे शेतकऱ्यांनी वनविभागाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी सर्व शेतकरी व ग्रामस्थांना कर्नाटक येथे घेऊन जाणार असल्याचे आश्वासन सिंधुदुर्ग वन विभागाने दिले होते. त्या अनुषंगाने हत्ती पकड मोहिमेतील भागाचा हा दौरा आजपासून सुरू झाला.
---
दौऱ्यात यांचा सहभाग
या दौऱ्यामध्ये वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ, वनपाल किशोर जंगले, वनरक्षक अजित कोळेकर, सुशांत कांबळे, स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, पाटये पुनर्वसन सरपंच प्रवीण गवस, हेवाळे उपसरपंच समीर देसाई, ग्रामपंचायत सदस्य यशवंत देसाई, तुकाराम दळवी, भाग्यश्री चारी, रवींद्र देसाई, सुमित गवस, लॉरेन्स डिसोझा, समीर ठाकूर यांसह प्रमोद गवस, आप्पा राणे आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com