

उद्योगमंत्री उदय सामंतांना वीज कामगारांची हाक
पेन्शनप्रकरणी मार्ग काढण्याची विनंती; वृद्धापकाळात कठिण परिस्थिती
रत्नागिरी, ता. १८ : आयुष्यभर मेहनत आणि कष्ट करणाऱ्या वीज कामगारांना वृद्धापकाळी पुरेशी पेन्शन मिळण्याचा कोणताही मार्ग वीज मंडळाने ठेवलेला नाही. निवृत्तीच्या दिवशी हातात पडलेली पूंजी कधीच संपून गेली. आता वृद्ध वीज कामगाराची आर्थिक कोंडी होऊन जगणे कठीण बनले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वीज कामगारांच्या पेन्शन प्रकरणी मार्ग काढावा, अशी मागणी पेन्शन कर्मचाऱ्यांनी केली आहे.
आयुष्यभर मेहनत आणि कष्ट करणाऱ्या वीज कामगारांना वृद्धापकाळी पेन्शनचा प्रश्न गंभीर आहे. १९९६ पासून पेन्शनचे आश्वासन देणाऱ्या मंडळाने स्वतःची पेन्शन योजना दिली नाहीच, तर केंद्र सरकारच्या ईपीएस योजनेत वेतनाच्या प्रमाणात पेन्शन देण्यास मनाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नोव्हेंबर २०२३ निकालानुसार, केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेत समावेश होण्याचा मार्ग या वीज कामगारांसाठी खुला झाला; परंतु वीज मंडळाने आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही आणि त्यामुळे वीज कामगारांना स्वतःची वर्गणी भरून मिळणाऱ्या पेन्शनचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत किंवा अन्य मार्गाने वीज कामगारांना स्वतःची वर्गणी देऊन मिळणाऱ्या पेन्शनचे अर्ज मंजुरीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता मंडळाने करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबत उद्योगमंत्री सामंत यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.