

-rat१८p३५.jpg -
२५N५२०१३
राजापूर ः नवजात कन्येचे आणि कुटुंबाचे स्वागत करताना बचतगटाच्या महिला.
---
नवजात कन्येसह कुटुंबाचे अनोखे स्वागत
मिठगवाणेत त्रिवेणी संघातर्फे कन्या जन्म स्वागत उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः मुलांच्या तुलनेमध्ये मुलींच्या घटलेल्या जन्मदराविषयी समाजामधून चिंता व्यक्ती केली जात असताना विवध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचा सामाजिक, शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या त्रिवेणी संघातर्फे ‘बेटी बचाओ’ उपक्रम राबवला जात आहे. ‘कन्या जन्म स्वागत’ उपक्रमांतर्गंत त्रिवेणी संघातर्गत कार्यरत असलेल्या बचतगटांच्या महिलांनी मिठगवाणे येथे नवजात कन्येसह त्या कुटुंबाचे अनोख्या पद्धतीने स्वागत आणि सत्कार केला.
जागृती गावविकास समितीतर्गत कार्यरत असलेल्या श्री गणेश, रिद्धी सिद्धी, शिवकन्या, विश्वजा या स्वयंसाहाय्यता महिला बचतगटाच्या महिलांनी मिठगवाणे सुतारवाडी येथील कन्यारत्नाचा लाभ झालेले मेस्त्री कुटुंब आणि नवजात कन्येचे स्वागत आणि सत्कार केला. या वेळी जागृती ग्रामविकास समितीचे अध्यक्ष वसुधा पावसकर, दीपाली कुवेस्कर, सचिव पंकजा नेवरेकर, खजिनदार अश्विनी कुवेस्कर, विश्वजा गटाच्या ज्येष्ठ सदस्या तारामती सुतार, संघ कार्यकर्त्या प्रतिभा मोहिते, त्रिवेणी संघाचे व्यवस्थापक राजन लाड यांसह बचतगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्त्री-पुरुष जन्मदरामध्ये समतोल राखला जावा, स्त्रीभ्रूण हत्या रोखली जावी या दृष्टीने शासनातर्फे जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, त्यानंतर जन्मदरामध्ये तफावत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये मुलांच्या तुलेनमध्ये मुलींचा जन्मदर कमी असल्याने त्याबाबत समाजामधून चिंता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीमध्ये बेटी बचाओचा समाजाला संदेश देण्याच्या उद्देशाने त्रिवेणी संघातर्फे कार्यरत असलेल्या बचतगटांच्या महिलांकडून कन्या जन्म स्वागत हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.