

फुटबॉलमध्ये कोल्हापूरचे वर्चस्व
डेरवण युथ गेम्स; तांदळे, भोसले, माळी गोल्डन बुटचे मानकरी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १८ : तालुक्यातील डेरवण येथील युथ गेम्सच्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. १८ वर्षांखालील वयोगटात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत ३४ संघ सहभागी झाले होते. एकूण ४६ सामने खेळवण्यात आले. तीन गटात खेळवण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये एकूण ८० गोलांची नोंद झाली.
स्पर्धेत खेळवण्यात आलेल्या १७ वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरची संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी विजेता ठरली असून कोल्हापूरचेच न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले. या स्पर्धेत गडहिंग्लज कोल्हापूर युनाटेडचा सक्षम तांदळे हा गोल्डन बुटचा मानकरी ठरला. याच गटात मुलींमध्ये कोल्हापूरची संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी विजेता व कोल्हापूरचीच एस. थ्री. सॉकर उपविजेती ठरली असून, पूर्वा भोसले गोल्डन बुट विजेती ठरली. १४ वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरची स्वराज्य अॅकॅडमी विजेता ठरली असून, कोल्हापूरचीच दूधगंगा व्हॅली उपविजेता ठरली. ब्रिजेश माळी हा गोल्डन बूटचा विजेता ठरला आहे.
----
व्हॉलिबॉलमध्ये सातारा, चिपळूण विजेते
डेरवण युथ गेम्समध्ये व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या १० तर मुलींच्या ४ अशा १४ संघांनी सहभाग घेतला होता. मुलींच्या स्पर्धेत सातारा येथील वाई व्हॉलिबॉल क्लब विजेता तर कोल्हापुरातील न्यू हॉरिझन स्कूल गडहिंग्लज उपविजेता ठरला तसेच मुलांच्या स्पर्धेत चिपळूण कुचांबे येथील टीसीसी विजेता तर रत्नागिरीतील अक्षय ११ उपविजेता ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.