शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरचे निर्विवाद वर्चस्व

शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरचे निर्विवाद वर्चस्व
Published on

कोल्हापूरचे निर्विवाद वर्चस्व
शूटिंग स्पर्धा ः सावर्डे डेवण येथील यूथ गेम्सतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १८ : तालुक्यातील सावर्डे डेरवण येथील यूथ गेम्सच्या शूटिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने निर्विवाद वर्चस्व मिळविले. या स्पर्धेत एकूण ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कोल्हापूरच्या २० स्पर्धकांनी प्रावीण्य मिळवून निर्विवाद वर्चस्व राखले. त्याखालोखाल रत्नागिरी ४, सोलापूर व सातारा प्रत्येकी ३, मुंबई २ व सिंधुदुर्ग १ अशा खेळाडूंनी यश प्राप्त केले.
कोल्हापूरच्या वेध रायफल अँड शूटिंग अकादमीच्या १२ खेळाडूंनी यश मिळविताना त्यांना कोल्हापूरच्याच सक्सेस शूटिंग अ‍ॅकॅडमी ३, ड्रिम ऑलिंपियन शूटिंग रेंज १, डी. वाय. पाटील विद्यानिकेतन १, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल १, लक्षवेध अॅकॅडमी १ व योगी प्रभुनाथ महाराज हायस्कूल १, अशा ८ खेळाडूंनी साथ दिली. डेरवण यूथ गेम्सच्या विविध प्रकारांत १४, १७ वयोगटांतील स्पर्धकांनी मिळविलेले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असे, पिप साईट प्रकारांत १४ वर्षांखालील मुलांमध्ये एसव्हीजेसीटी डेरवणचा हर्ष बागवे, वेध कोल्हापूरचा शर्व घुगरे व सिंधुदुर्गचा शिवम चव्हाण, तर मुलींमध्ये बीईएस मेमन मुंबई उपनगर हायस्कूलची जानकी महाडिक, ड्रीम कोल्हापूरची मुस्कान मुलानी व जिंदाल विद्यामंदिरची देवश्री कासार, पिप साईट प्रकारात १७ वर्षांखालील मुलांमध्ये डी. वाय. पाटीलचा वरदराज पोवार, मुंबई उपनगरातील जनसेवा समिती रायफल पिस्तूल क्लबचा अद्वैत आंब्रे व एसव्हीजेसीटी डेरवणचा यश सावंत, मुलींमध्ये वेध कोल्हापूरच्या हिरण्या सासने, काव्यांजली नाकटे व युगरत्ना शर्मा आणि सान्वी नाळे, एअर पिस्तूल प्रकारात १४ वर्षांखालील मुलांमध्ये सक्सेस कोल्हापूरचे दर्श पाटील, आदित्य वायचळ व आर्यमन पिलीव अ‍ॅकॅडमी सोलापूरचा वीरधवन बैस, मुलीमध्ये साताऱ्याच्या मेरी माता हायस्कूलची स्वरा कालढोणे, कोल्हापूर सक्सेसची स्वरांजली जाधव व रत्नागिरी सिक्रेड हार्ट हायस्कूलची दुर्गा जाधव, एअर पिस्तूल प्रकारात १७ वर्षांखालील मुलीमध्ये कोल्हापूरच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलची गौरी चव्हाण व साताऱ्याच्या मेरी माता हायस्कूलची पियुषा सानप, ओपन साईट प्रकारात १७ वर्षांखालील मुलांमध्ये वेध कोल्हापूरचा तीर्थ पोवार, शिवेंद्र खाटकर व माळशिरस सोलापूरचा विनायक माने, तर मुलींमध्ये लक्षवेध कोल्हापूरची वैष्णवी पाटील, साताऱ्यातील खेर्डी येथील मेरी माता स्कूलची आसावरी मेलावणे व वेध कोल्हापूरची स्नेहांकिता चौगुले, ओपन साईट प्रकारात १४ वर्षांखालील मुलांमध्ये वेध कोल्हापूरचा ऋग्वेद खोत, चिन्मय बुइंबर व कोल्हापूरच्या योगी प्रभुनाथ महाराज हायस्कूलचा आदित्य पाटील, मुलींमध्ये वेध कोल्हापूरची भार्गवी पाटील, सान्वी घाटगे व माळशिरस सोलापूरची राजलक्ष्मी शिद या स्पर्धकांनी शूटिंग स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com