चिपळूण पालिकेची१८ कोटींपैकी १० कोटी वसुली

चिपळूण पालिकेची१८ कोटींपैकी १० कोटी वसुली
Published on

चिपळुणात १८ कोटींपैकी १० कोटी वसुली
पालिकेची कारवाई ; ४१ जणांचा पाणीपुरवठा खंडित
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः गेल्या काही दिवसांपासून मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर येथील पालिकेने मालमत्ता व पाणीपट्टी वसुली मोहीम राबवली आहे. यामध्ये आत्तापर्यंत मालमत्ता करामध्ये सुमारे १८ कोटींपैकी सुमारे १० कोटी वसुली तर पाणीपट्टी ९५ लाख रुपये वसुली करण्यात चिपळूण पालिकेला यश आले आहे. यापूर्वीच नोटिसा दिलेल्या नागरिकांवर धडक कारवाई करताना आजपर्यंत ४१ जणांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. प्रसंगी जप्तीची कारवाई करून मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाणार असल्याची माहिती चिपळूण पालिकेच्या सूत्रांनी दिली.
चिपळूण पालिकेला यावर्षी मालमत्ता व पाणीपट्टीतून थकित व चालू वर्षाची मिळून १८ कोटी ३३ लाख ८१ हजार ५३७ रुपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे १० कोटी ६६ लाख ९० हजार ५८५ रुपये वसूल झाले असून, ५८.१८ टक्के वसुली झाली आहे. वसुलीबाबत शासनाचे कडक धोरण असल्याने व अपेक्षित वसुली न झाल्यास त्याचा अनुदान मिळवण्यास मोठा फटका बसत असल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी तथा कर वसुली अधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे यांनी वसुलीचा टक्का वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्याधिकारी भोसले वसुलीसाठी शहरात फिरत आहेत. यामुळे अनेकजण कर भरत असले तरी काहीजण आजही कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे काहीजणांना मालमत्ता जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
---
अशी करणार जप्तीची कारवाई
२४ तासात थकित कर न भरल्यास संबधितांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर ६ महिन्यांपर्यंत त्यांना दंड व अन्य नियमांना अधीन राहून आपली मालमत्ता सोडवता येणार आहे. या मुदतीत ज्या मालमत्ता सोडवल्या जाणार नाहीत त्यांचा थेट लिलाव केला जाणार आहे; मात्र लिलावातून आवश्यक रक्कम मिळत नसल्यास त्या मालमत्तेवर पालिकेचे नाव चढवले जाणार आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत जमा करावा, असे आवाहन चिपळूण पालिकेने केले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com