मंडणगड-३७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची उपाययोजना

मंडणगड-३७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची उपाययोजना
Published on

पाणीटंचाईवर ३७ वाड्यांमध्ये उपाययोजना
मंडणगड तालुका; ३१ गावाचा समावेश, दोन टप्प्यात काम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ः मंडणगड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पाणीटंचाई समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विलंबाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. यात तालुक्यातील ३१ गावातील ३७ वाड्यांची पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी यंत्रणा काम करणार आहे. यासाठी १ कोटी २३ लाखाचा निधी खर्च होणार आहे. मार्च महिन्याचा विलंब लक्षात घेता दोन टप्प्यात काम केले जाणार आहे. जानेवारीत तयार होणारा टंचाई कृती आराखडा विविध कारणांनी विलंबाने झाला असला तरी समस्येच्या वास्तवाशी जवळीक साधणारा आहे.
टंचाई दूर करण्यासाठी नवीन विंधन विहीर खणणे, जुन्या नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना सुरू करणे व आवश्यकता भासल्यास टँकरचा पाणीपुरवठा करण्यासाठीही निधीचे नियोजन केले आहे. तीव्र टंचाईचे काळात तालुक्यातील पाच गावातील सात वाड्यांवर दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. विविध नळपाणी योजनांची सातत्याने अंमलबजावणी करूनही पाण्याची गैरसोय दूर झालेली नसल्याची तक्रार तालुकावासीयांमधून नेहमीच होत असते, यावर यंत्रणा मात्र सगळे काही आलबेल असल्याचे सांगत असते.
नागरिकांच्या तक्रारी व समस्या यांचा कागदावर कधीच मेळ बसत नाही. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांचे अंर्तगत योजनेची तालुक्यातील ८०हून अधिक गावात प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा करत आहेत. या योजनेच्या चुकीच्या पद्धतीने विनियोगाच्या तक्रारी अनेक गावांमधून होत असताना यंदा नागरिकांच्या वाढलेल्या तक्रारीचे प्रतिंबब टंचाई कृती आराखड्यावर पडलेले दिसून आलेले आहे. या पुढील काळात या यादीत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.

चौकट
ही कामे आहेत प्रस्तावित
टंचाई आराखाड्यात १३ गावातील १४ वाड्यांमध्ये नवीन विंधन विहीर प्रस्तावित आहे. तसेच एका गावातील एका वाडीवर विंधन विहीर दुरुस्तीचे काम प्रस्तावित आहे. यासह १० गावातील १३ वाड्यांवर नळयोजना दुरुस्तीचे कामे प्रस्तावित, ५ गावातील ६ वाड्यांवर तात्पुरत्या पूरक नळपाणी योजनेचे काम प्रस्तावित आहे. २ गावातील ३ वाड्यांवर टँकरचे पाणीपुरवठा कामाच्या प्रस्तावात नियोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील नागरिकांनी पाण्याचा अतिवापर टाळावा, पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन या निमित्ताने यंत्रणेच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com