तुरळ येथे अपघातात २ दुचाकीस्वार ठार

तुरळ येथे अपघातात २ दुचाकीस्वार ठार
Published on

तूरळ येथील अपघातात दोघे ठार
दोन दुचाकीची धडक
तुरळ येथे अपघातात २ दुचाकीस्वार ठार
समोरासमोर धडकल्या ; एकाचा जागीच मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी स्मशानभूमीसमोर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता.१७) रात्री साडेआठच्या सुमारास झाला. अपघातात मृत दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर शिमगोत्सावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू झालेला एक तरुण तुरळ येथील तर दुसरा धामापूर येथील आहे.
सूरज राजाराम फडकले (वय २८, रा. हरेकरवाडी, तुरळ) हा दुचाकी घेऊन तुरळ येथून आरवलीकडे जात होता, तर संदेश सखाराम भोजने (वय ४०, रा. ओसेवाडी, धामापूर) हा दुचाकी घेऊन आरवली येथून तुरळ येथे जात असताना महामार्गावरील तुरळ हरेकरवाडी स्मशानभूमीसमोर दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात संदेश भोजने याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर सूरज फडकले याचा संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी पंचनामा केला. अपघाताची घटना कळताच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृत तरुणांचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com