रेल्वे मार्गावरील दाखल प्रकरणे जिल्हा न्यायालयात

रेल्वे मार्गावरील दाखल प्रकरणे जिल्हा न्यायालयात
Published on

रेल्वे मार्गावर दाखल होणारी
प्रकरणे जिल्हा न्यायालयात
रत्नागिरी, ता १८ः कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल होणारी प्रकरणे रत्नागिरी न्यायालयात चालवण्यात येणार आहेत. २० फेब्रुवारी २०२५ पासूनचे रिमांड काम व नव्याने दाखल होणारे दोषारोपपत्र सर्वप्रथम मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाखल होतील आणि रत्नागिरी न्यायदंडाधिकारी वर्ग-१ यांच्या न्यायालयात निकाली निघणार आहेत. निकाली प्रकरणांचे अपिल कार्यक्षेत्र सत्र न्यायालय रत्नागिरी असेल, अशी माहिती जिल्हा न्यायालयाकडून दिली आहे.
कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाणे नव्याने सुरू केले आहे. रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगांवरोड, वीर, सापेबामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड (पोलिस दूरक्षेत्र), अंजणी, कळंबणी, चिपळूण, कामथे, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, कडवई, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड आदींचा समावेश आहे. या अधिकारक्षेत्राच्या २७ पोलिस कार्यक्षेत्रांमध्ये भारतात व महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या रेल्वे अॅक्ट १९८९ व रेल्वे प्रोटेक्शन अॅक्ट १९६६ कायद्याप्रमाणे न्यायालयापुढे कामकाज चालणार आहे, असे जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com