कुडासे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

कुडासे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे
Published on

52067

कुडासे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

पोटनिवडणूक बिनविरोध ः सरपंचपदी देसाई, कुडासकर उपसरपंच

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ : कुडासे सरपंच, उपसरपंच पोटनिवडणूक आज झाली. बिनविरोध निवडून आलेले सरपंच, उपसरपंच शिवसेने असल्याने ही ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेच्या हाती आली आहे. माजी सरपंच व दोडामार्ग शिवसेना महिला उपतालुकाप्रमुख पूजा देसाई यांनी नवनिर्वाचित सरपंच नम्रता देसाई यांच्याकडे पदभार दिला, तर माजी उपसरपंच आत्माराम देसाई यांनी नवनिर्वाचित उपसरपंच प्रसाद कुडासकर यांच्याकडे धुरा सोपविली.
कुडासे ग्रामपंचायत निवडणुकीवेळी सरपंच व उपसरपंचपद अडीच वर्षांच्या कालावधीत विभागून घेण्याचा निर्णय गाव बैठकीत ठरला होता. त्याप्रमाणे पूजा देसाई बिनविरोध सरपंचपदावर विराजमान झाल्या होत्या. उपसरंचपदी आत्माराम देसाई यांची नावड झाली होती; मात्र गाव एकोप्यातून घेतलेल्या निर्णयानुसार अडीच वर्षांचा कालावधी या दोघांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदासाठी सदस्यांतून निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली आज कुडासे ग्रामपंचायत कार्यालयात झाली. सरपंचपदासाठी नम्रता देसाई व उपसरपंचपदासाठी कुडासकर यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात अन्य नामनिर्देशन पत्र सादर झाले नसल्याने या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
यावेळी मंडळ अधिकारी राजन गवस, श्री. शिरसाट, प्रशासकीय अधिकारी तायडे, शिंदे शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा देसाई, शिंदे शिवसेना महिला उपतालुकाप्रमुख पूजा देसाई, ग्राम महसूल अधिकारी भंडारे, ग्रामसेवक अशोक गायकवाड, शिंदे शिवसेना विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, कुडासे शाखाप्रमुख किशोर देसाई, संजय धुरी, पोलिसपाटील रेश्मा पाटील, नीलेश देसाई, राजाराम देसाई, भाग्यश्री राऊळ यांसह सत्यवान देसाई, संजय धुरी, विनोद शेटये, नामदेव देसाई, काशिनाथ राऊत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com