

52073
दोडामार्गात करबुडव्यांना
नगरपंचायतीचा दणका
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ : कसई दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयाद्वारे सोमवारी (ता. १७) मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी तीन घरांची पाणीपट्टी थकीत असल्याने नळजोडणी तोडण्यात आली, तर एका फ्लॅटचा इमारत कर न भरल्याने तो सिल करण्यात आला.
ही मोहीम मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी कार्यालय अधीक्षक दीपाली मुंडये, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत पिळणकर, स्वच्छता निरीक्षक निवेद कांबळे, लिपिक संजय शिरोडकर, पंप ऑपरेटर सुभाष केतकर, व्हॉल्वमन प्रथमेश चव्हाण, स्वप्नील सावंत, नगरपंचायत कर्मचारी प्रणाली शेटकर, वैष्णवी गवस आदी उपस्थित होते, अशी माहिती नगरपंचायतीने प्रेस नोटद्वारे दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.