

५२०५८
५२०६०
५२०६१
चांदी व्यापाऱ्याला
दहा लाखांचा गंडा
तिघांना अटक ः संशयित रेंदाळचे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः चांदी व्यापाऱ्याकडून दागिने बनवून घेऊन बदल्यात कमी टंचाची चांदी देत १० लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. धनंजय दिलीप पाटील (वय २६), दीपक मनोहर वाईंगडे (३३) व सचिन शिवाजी साबळे (३६, तिघे रा. रेंदाळ, हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत कल्पेश माणिकचंद ओसवाल (भक्तिपूजानगर, मंगळवार पेठ) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय करतात. तिघांनी फिर्यादी कल्पेश ओसवाल यांच्याकडून १५ किलो ३७५ ग्रॅमचे चांदीचे दागिने घेतले होते. त्या बदल्यात त्यांना शंभर टक्के टंच असलेली १३ किलो ६९ ग्रॅम चोख चांदी देणे गरजेचे होते; मात्र त्यांनी केवळ २० टक्के टंचाची चांदी परत करत १० लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. याबाबत ओसवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.