कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष

कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष

Published on

-rat२४p२.jpg-
२५N५३१११
देवरूख ः विद्यार्थ्यांनी साकारलेली जलविषयक समस्या अधोरेखित करणारी पोस्टर्स.
----
उन्हाळ्यात कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य
प्रा. धनंजय दळवी ः सप्रे महाविद्यालयात जागतिक जलदिन
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २५ः कोकण विभागाचा विस्तार राज्याच्या भौगोलिक तुलनेत १० टक्के असून, येथील पर्जन्यमान राज्याच्या तुलनेत ४० टक्के असले तरीही उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. ही बाब गंभीर आहे. पाणीबचत व संवर्धनासाठी प्रत्येकाने कृती करावी, असे आवाहन प्रसिद्धी विभाग समन्वयक प्रा. धनंजय दळवी यांनी केले.
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात ''जागतिक जलदिना''निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रसिद्धी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाने यासाठी पुढाकार घेतला होता. जल किंवा पाणी या महत्वपूर्ण घटकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी तसेच पाणीबचत व संवर्धनाबाबत जाणीव निर्माण व्हावी हा या मार्गदर्शनामागील उद्देश होता. पाण्याचा विविध प्रकारे होणारा अपव्यय टाळला पाहिजे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत विविध कारणांनी प्रदूषित झाल्यामुळे त्या पाण्याचा वापर घातक बनत आहे, यावर कायमस्वरूपी ठोस उपाय करण्याची गरज प्रा. दळवी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, जागतिक जलदिनाची यावर्षीची संकल्पना ''हिमनदी संवर्धन'' ही आहे. हिमनद्यांमुळे स्वच्छ व शुद्ध पाण्याचा साठा निर्माण होतो. त्यामुळे हिमनद्या मानवासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यांचे संवर्धन व संरक्षण झाल्यास भविष्यात पिण्याचे व शेतीचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. देशातील एकूण धरणांपैकी ३६ टक्के धरणे एकट्या महाराष्ट्रात असूनही आज महाराष्ट्र ''पाणीबाणी''च्या कड्यावर उभा आहे. भूजलाचा मुख्य स्रोत पाऊस आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरले पाहिजे; परंतु ते पाणी नदीत जाऊन पुढे समुद्राला मिळते, हा अपव्यय थांबला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com