

टेक्नो..........लोगो
(१९ मार्च टुडे ३)
आज वर्गात विद्यार्थी ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ बसू शकत नाहीत. ४५ किंवा ६० मिनिटांचे लेक्चर ऐकणे किंवा समजून घेणे त्यांना अवघड वाटत आहे. क्लास बंद करणे किंवा गैरहजर राहणे नित्याचेच झाले आहे. आम्ही शिक्षक फार हुशार! ही परिस्थिती विद्यार्थी पार्टटाईम किंवा फुलटाइम जॉब करतात म्हणून निर्माण झाली, असे आम्ही मानतो; परंतु लेक्चरच्या ४५ मिनिटात आम्ही असे काय तंत्रमंत्र वापरतो किंवा काय जादू करतो की, ज्यामुळे त्या विद्यार्थ्याने पूर्णवेळ लेक्चरमध्ये हजर राहावे? माझा विद्यार्थी निव्वळ फिजिकलीच प्रेझेन्ट न राहता मेंटलीदेखील प्रेझेन्ट राहावा याकरिता मी काय करतो हे देखील स्वतःस विचारणे गरजेचे आहे.
- rat२५p१.jpg-
P25N53303
- डॉ. नितीन कोळेकर, चिपळूण
---
शिकण्या-शिकवण्यातील
तंत्र-मंत्र अन् गेमिफिकेशन
तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने होणारे बदल आणि त्यामुळे शिकण्या-शिकवण्यामध्ये होणारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे डोळे विस्फरून टाकणारे होत आहे. हे कोरोना महामारीने दिलेल्या धड्यापैकी एक धडा असल्याचे मान्य करावेच लागेल. कोरोना काळातील वेगवेगळ्या वयोगटातील आणि कोर्सेससाठी प्रवेशित किंवा पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वादातीत असल्याची वक्तव्ये अनेक नामवंतांकडून करण्यात आली; परंतु ऑनलाईन शिक्षणपद्धती, वेगवेगळे टेक्निकल गॅझेट्स आणि टुल्स वापरून शिकणे तसेच शिकवणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षक जे शिकवतो ते तर विद्यार्थ्यांना युट्युब, गुगलवरून मिळतेच. विद्यार्थी तेवढाही त्रास न घेता Chat GPT किंवा Meta AI चा वापर करणे जास्त सोईचे मानतात. मग शिक्षकांची गरजच काय? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. ‘घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ; पण पाणी त्याचे त्याने प्यायचे आहे’ हा जर शिक्षकांचा स्वभाव असेल तर वर्गात न येताही विद्यार्थी पास मात्र शिक्षक नापास! ही परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आज रोजी घोड्याला निव्वळ पाण्यापर्यंत नेऊन भागणार नाही तर त्याच्यामध्ये प्रचंड अशी तहानदेखील निर्माण करावी लागेल.
एखाद्या विषयामध्ये विशेष गोडी, आकर्षण निर्मिती होऊन दैनंदिन व्यवहारात त्या विषयाच्या होणाऱ्या उपयोगाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये झाली तर शिकण्यात रूची निर्माण होते, हे सर्वमान्य तत्त्व आहे. या कामी वेगवेगळ्या तांत्रिक संसाधनांचा तसेच सहयोगी आणि सहभागी शिक्षणप्रणालीचा प्रभावी उपयोग होते, हे देखील प्रयोगाने सिद्ध झाले आहे तसेच या प्रक्रियेमध्ये गेमिफिकेशनचा प्रभावी वापर करून शिकणाऱ्याला शिकणे हे अतिशय आकर्षक, मजेशीर आणि खेळीमेळीचे वाटू लागले तर त्यामधील त्याचा इंटरेस्ट वाढून परफॉर्मन्स सुधारू शकतो. विविध देशांमध्ये तेथील सरकार, विद्यापीठ प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन यांनी एकमेकांच्या मदतीने गेमिफिकेशनचा शिक्षणपद्धतीमध्ये अधिकृतरित्या अत्यंत प्रभावी वापर सुरू केलेला आहे. याबाबत शिक्षक कम्युनिटीमध्ये प्रशिक्षणाची देवाणघेवाण होणे ही काळाची गरज आहे.
वेगवेगळ्या वयोगटातील लर्नर्सकरिता त्यांच्या विषयास अनुसरून वेगवेगळे गेम्स आणि पद्धती वापरल्यास यामधून योग्य असा बदल झालेला दिसून येईल. या ठिकाणी आपण काही महत्वाच्या गेमिफिकेशन तसेच ICT साधनांचा वापर कशाप्रकारे किंवा कोणकोणत्या कामाकरिता करता येईल हे पाहूया. Wordwall: https://wordwall.net/ हा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. येथे गेमिफिकेशनचा वापर आपण टिचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये अतिशय उत्तमरित्या करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने Match up, Quiz, Speaking Cards, Flash cards, Group sort, spin the wheel या प्रकारचे असाइनमेंट आपण तयार करू शकतो किंवा तयार टेम्प्लेट्स डाऊनलोड करून आपल्या विद्यार्थ्यांकरिता वापरू शकतो. यामध्ये जगभरातील विविध भाषेतून टेम्पलेट तयार करता येऊ शकतात. भारतातील हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये हे प्लॅटफॉर्म वापरता येते. पुढील लेखात आपण आणखी काही गेमिफिकेशनचे प्लॅटफॉर्म आणि त्यांची वैशिष्ट्ये याबाबत माहिती घेऊ.
(लेखक घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत.)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.