तेर्ये ग्रामस्थांकडून प्रमिला म्हैसकर यांचा सत्कार
प्रमिला म्हैसकर यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः वाघजाई ग्रामदेवता पालखी उत्सवावेळी तेर्ये (बुरंबी) येथील सेवाव्रती महिला प्रमिला श्रीकांत म्हैसकर (वय ८७) यांचा तेर्ये ग्रामदेवतेचे ट्रस्टी प्रकाश दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
म्हैसकर या गेली पन्नास वर्षे सातत्याने सेवा म्हणून दशक्रोशीमधील, तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील लोकांना काविळवरील आयुर्वेदिक औषध अव्याहतपणे देत आहेत. या औषधाने अनेक माणसे बरी झाली. कुटुंबासोबत समाजात राहताना सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं देणं लागतो, ही तळमळ ठेवून सर्व जातीधर्माच्या लोकांना त्यांनी समाजसेवा सुरू केली. आजपर्यंत काविळीच्या हजारो रुग्णांना या औषधाचा गुण आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

