निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. नगरकरांची भेट
rat२५p२.jpg-
२५N५३३०७
रत्नागिरी ः सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेची पाहणी करताना पुण्यातील डीआरडीओचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. नगरकर. सोबत विनायक हातखंबकर, रवींद्र इनामदार, विलास सावंत आणि राजेश आयरे आदी.
---
सोमेश्वर येथील गोशाळेला
निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. नगरकरांची भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : तालुक्यातील सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेत रत्नागिरी शहरातील भटक्या बेवारस गाईगुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा गाईगुरांना पाहण्यासाठी व त्यांची देखभाल कशी चालली हे जाणून घेण्यासाठी पुण्यातील डीआरडीओचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. नगरकर यांनी गो शाळेला भेट दिली.
सोमेश्वर येथील गोशाळेच्या भेटीदरम्यान डॉ. नगरकर यांनी गुरांच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली तसेच या प्रकल्पांतर्गत गोविज्ञान केंद्र वृद्धाश्रम योग व निसर्गोपचार केंद्र आणि प्रास्तावित असलेले गुरूकुल हा उपक्रमही त्यांनी जाणून घेतला तसेच या प्रकल्पाला मी कायमस्वरूपी जोडून घेईन, असे आश्वासनही त्यांनी दिले. समाजामध्ये अशी उपयोगी व लोककल्याणकारी कामे झाली पाहिजेत, अशा प्रकारचे उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले. या वेळी विनायक हातखंबकर, रवींद्र इनामदार, रहाटे, पाटील त्याचबरोबर विलास सावंत आणि राजेश आयरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

