मळगाव विद्यालयाचे विविध परीक्षांमध्ये यश

मळगाव विद्यालयाचे विविध परीक्षांमध्ये यश

Published on

swt256.jpg
53360
मळगावः परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह मान्यवर.

मळगाव विद्यालयाचे
विविध परीक्षांमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव जिल्हा परिषद शाळेने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षा, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा व भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत ११ विद्यार्थी, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये १ व भारत टॅलेंट सर्च परीक्षेत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोमवारी (ता. २४) प्रशालेत करण्यात आला.
यावेळी समितीतर्फे पेन व पुष्गुच्छ देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, सरिता पाटील, सदस्य दत्ताराम मळगावकर, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, स्वरा वारंग, पालक प्रवीण डोंगरे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com