इस्रो सहलीसाठी हंसिकाची निवड
इस्रो सहलीसाठी
हंसिकाची निवड
वेंगुर्लेः ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत वेंगुर्ले शाळा क्र. ४ ची सातवीतील विद्यार्थिनी हंसिका वजराटकर हिने तालुक्यात द्वितीय व जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकावला. ती इस्रोच्या सहलीस पात्र ठरली आहे. तसेच ‘बीडीएस’ परीक्षेत सुवर्णपदक मिळवून देशात ९२ वा क्रमांक मिळविला. हिंदी प्रवेशिका परीक्षेतही तिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिला शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गौरविण्यात आले. यावेळी शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित राऊळ, अॅड. मेधा परब, अणसूरचे माजी सरपंच अन्विशा गावडे, माजी केंद्रप्रमुख भास्कर पुरळकर, सुधर्म गिरप, सुनंदा खंडागळे, सानिका कदम, मुख्याध्यापिका संध्या बेहेरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक संतोष परब यांनी केले. भूमिका परब हिने आभार मानले.
....................
‘महावितरण’कडून
वसुली मोहीम तीव्र
सिंधुदुर्गनगरीः महावितरणच्या कोकण परिमंडल, रत्नागिरीअंतर्गत महावितरणला ३१ मार्च अखेर २३ कोटी ७० लाख वसूल करायचे आहेत. त्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली असून वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. वीज बिल भरणा केंद्रे ३१ मार्च अखेर सर्व सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू तसेच थकीत वीज बिल भरावे आणि आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. चालू आर्थिक वर्षाचे केवळ ९ दिवस शिल्लक आहेत. कोकण परिमंडल, रत्नागिरीअंतर्गत प्रत्येक दिवसाला २ कोटी ६३ लाख वसूल करायचे आहेत. थकित वीज बिलांच्या वसुलीसाठी मुख्य अभियंता अनिल डोये यांच्यासह रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे, सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते आपल्या संपूर्ण पथकासह वसुली मोहिमेत सहभागी झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
.....................
रेयांश कोळसुलकरचे
प्रज्ञाशोध परीक्षेत यश
वेंगुर्लेः भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये वेंगुर्ले शाळा क्र.३ मधील चौथीतील विद्यार्थी रेयांश कोळसुलकर याने ३०० पैकी २६४ गुण मिळवून तसेच ऑल इंडिया ब्रेन डेव्हलमेंट परीक्षेतही १०० पैकी ९० गुण मिळवून वेंगुर्ले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. रेयांशने सलग तीन वर्षे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शाळ क्र.३ चे मुख्याध्यापक शंकर सावंत, वर्गशिक्षक राकेश देसाई यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीतर्फे रेयांशचे अभिनंदन करण्यात आले.
....................
माडखोल शाळेचे
विद्यार्थी चमकले
ओटवणेः फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप राज्यस्तरीय परीक्षेत माडखोल-धवडकी शाळा क्र. २ च्या दोन विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले. माडखोल क्र. २ धवडकी शाळेच्या तिसरीतील संस्कृती चोपडे हिने १०० पैकी ९४ गुण तर रुद्र पाटील याने १०० पैकी ९१ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, मुख्याध्यापिका भावना गावडे व सहकारी शिक्षकांनी अभिनंदन केले.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

