संजय गांधी योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजुरी

संजय गांधी योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजुरी

Published on

संजय गांधी योजनेच्या
९७ प्रकरणांना मंजुरी
कणकवलीः संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील ९७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या या बैठकीला देशपांडे यांच्यासहित गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, अव्वल कारकून डी. एम. पाटील, हेमलता तोरस्कर, अक्षता बागवे आदी उपस्थित होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या ४८, श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती योजनेच्या गट अ मधील ८, श्रावणबाळ सेवा राष्ट्रीय निवृत्ती योजना गट ब मधील ३३, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेच्या ८ अशा एकूण ९७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
................
वेरलीत शनिवारी
‘सहस्र नागबळी’
मसुरेः गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी (ता. २९) रात्री १० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ‘सहस्र नागबळी’ हा नाट्यप्रयोग वेरली-सडेवाडी येथे होणार आहे. या नाट्यप्रयोगास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाश चव्हाण मित्रमंडळ आणि वेरली ग्रामस्थांनी केले आहे.
....................
भेडशीत आजपासून
नाटकांचे आयोजन
दोडामार्गः तालुक्यातील भेडशी गावच्या पंधरा दिवसांच्या शिमगोत्सवाची सांगता २७ मार्चला होणार आहे. यानिमित्त येथील दामोदर नाट्य मंडळातर्फे नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळातर्फे तीन दिवस नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. यात २५ ला कालिदास भणगे, अजित कुबडे, संदीप डांगी दिग्दर्शित ‘फरारी’, २६ ला संतोष भिसे दिग्दर्शित ‘अखेरची अंगाई’ नाटक होणार आहे. दोन्ही नाट्यप्रयोगांत दामोदर नाट्य मंडळाचे स्थानिक कलाकार सहभागी होणार आहेत. नाट्यप्रयोगांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे दामोदर करण्यात आले आहे. शिमगोत्सव सांगता सोहळ्यास २७ मार्चला सकाळपासून रंगपंचमीला सुरुवात होणार आहे. नारळ ठेवणे, गाऱ्हाणे घालणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दुपारनंतर सामूहिक गाऱ्हाण्यांनी शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.
...................
रुपेंद्र परब यांना
‘संगीत अलंकार’
वेंगुर्लेः वेंगुर्ले-वडखोल येथील भजनकार बुवा रुपेंद्र परब यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार परीक्षेत यश संपादित करत ‘संगीत अलंकार’ पदवी प्राप्त केली. परब यांनी आपल्या सांगीतिक जीवनाची सुरुवात वडील बुवा भास्कर परब यांच्या मार्गर्शनाखाली केली. पुढील शिक्षण संगीत अलंकार श्रीराम दीक्षित यांच्याकडे घेतले. या त्यांच्या संगीत प्रवासात बुवा भालचंद्र केळुसकर, राजन माडीये, पं. भीमसेन जोशी व पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य राजदत्त आंबार्डेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धांमध्ये भाग घेत आपल्या पहाडी आवाजाने संगीत रसिकांच्या हृदयात स्थान प्राप्त करत त्यांनी अनेक स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशात संगीत अलंकार वीणा दळवी व गुरुदास गावकर (गोवा) यांचे सहकार्य लाभले. ते पुढील शिक्षण पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य डॉ. प्रवीण गावकर (गोवा) यांच्याकडे घेत आहेत.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com