सुरक्षित पर्यटनासाठी आता ''पर्यटन पोलिस''
swt258.jpg
53362
मालवणः येथे वाहन अनावरणप्रसंगी कोकण विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्याकडून चावी स्विकारताना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल. (डावीकडे) अपर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले.
सुरक्षित पर्यटनासाठी आता ‘पर्यटन पोलिस’
सिंधुदुर्ग पोलिसांचा पुढाकारः शासनाकडून गस्तीसाठी १८ मोटार सायकल प्रदान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ः सिंधुदुर्ग हा कुटुंबवत्सल पर्यटन जिल्हा आहे. याला गालबोट लागू नये म्हणून सिंधुदुर्ग पोलीस हे पूर्ण ताकदीने काम करत असून पर्यटन पोलिस ही संकल्पना सुद्धा ते प्रभावीपणे यशस्वी करतील, असा विश्वास जिल्हा पोलिसांच्यावतीने सुरू केलेल्या पर्यटन उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १८ मोटार सायकल प्रदान कार्यक्रमात मालवण बंदर जेटी येथे केले.
मुख्यमंत्री यांनी सर्व प्रशासकीय विभागांना दिलेल्या शंभर दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्यास अनुसरून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचे पुढचे पाऊल म्हणून कोकण विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पर्यटन पोलीसींग हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटन विकसित झाले आहे. जिल्ह्याच्या एका बाजुला सह्याद्री आणि एका बाजुला अरबी समुद्र किनारा असून मालवण, तारकर्ली, देवबाग, भोगवे, आचरा, देवगड, वेंगुर्ला, शिरोडा इत्यादी बीच व पर्यटन स्थळे प्रसिध्द आहेत. त्यामुळे सुरक्षित पर्यटन ही मोठी जबाबदारी आता सिंधुदुर्ग पोलिसांची राहणार आहे. याच कारणासाठी पर्यटकांना सुकर व सुरक्षित वातावरणामध्ये पर्यटन करता यावे तसेच त्यांना अडीअडचणीच्या वेळी सत्वर मदत मिळावी, या उदात्त हेतूने पर्यटन पोलीस हा नाविन्यपुर्ण उपक्रम जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे.
पर्यटन पोलिस या उपक्रमांअंतर्गत जिल्ह्यात येणारा पर्यटक सुरक्षित यावा याकरीता सुरळीत वाहतुक नियोजन, येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक किंवा विनाकारण कोठेही अडवणुक होऊ नये तसेच पर्यटकांच्या तक्रारीना तात्काळ न्याय मिळावा या उद्देशाने सोमवारी (ता.२४) मालवण बंदर जेट्टी या ठिकाणी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या शुभहस्ते जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग पोलीस दलाला पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्राप्त झालेल्या १८ मोटार सायकल प्रदान करण्याचा सोहळा झाला. या मोटारसायकलव्दारे आता निश्चितपणे पर्यटकांचे सुरक्षेसाठी प्रभावीपणे गस्त ठेवणे सुकर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असणारे पर्यटन आणि जिल्ह्यातील बाजारपेठ, समुद्राकडे जाणारे अरुंद रस्ते यामध्ये मोठ्या वाहनांच्या तुलनेत मोटर सायकलने लवकर पोहचून पर्यटकांना तत्काळ मदत पोहचणे शक्य होणार आहे. प्रत्येक मोटर सायकलवर दोन पोलिस अंमलदार तसेच महिला अंमलदार सुद्धा वायरलेस वॉकीटॉकी सह तैनात असणार आहेत.
दरम्यान, याप्रसंगी मालवण शहरातील इतिहास तज्ञ, सेवाभावी संस्था तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिस पाटलांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, मालवण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, मोटार परिवहन विभाग प्रदिप चव्हाण तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलिस पाटील, नागरिक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
चौकट
ऑनलाईन तक्रारीचा पर्याय
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सिंधुदुर्ग पोलीस वेबसाईट नव्याने अद्यावत केलेली आहे. त्यामध्ये पर्यटनाचे दृष्टीने प्रमुख पर्यटन स्थळे व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणारे हवाई रस्ते, रेल्वे व सागरी मार्ग, पर्यटनासाठी आवश्यक सुरक्षितता सुचना, सण व कार्यक्रम आणि प्रवासाबाबतची माहिती देण्यात आलेली असून पर्यटकांना काही अडचणी किंवा तक्रार असल्यास ती ऑनलाईन पध्दतीने नोंदवू शकातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

