कुरंगवणेत गोठा जळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

कुरंगवणेत गोठा जळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Published on

swt253.jpg
53357
कुरंगवणे ः पवारवाडी येथील गोठा जळून खाक झाला. नुकसानीची पाहणी करताना सरपंच पप्पू ब्रम्हदंडे. (छायाचित्र ः एन. पावसकर)

कुरंगवणेत गोठा जळून
शेतकऱ्याचे नुकसान
सरपंच, तलाठी यांनी भेट देऊन केला पंचनामा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ : कुरंगवणे पवारवाडी येथील शेतकरी प्रकाश पवार यांच्या मालकीचा पवारवाडी येथे असलेला गुरांचा गोठा रविवारी (ता. २३) सकाळी ११.३० च्या दरम्यान लागलेल्या आगीत जळून खाक झाला.
सुदैवाने गोठ्यात जनावरे नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे पवार यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी पवारवाडी येथे घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली. तसेच पवार यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. तलाठी श्रीमती अग्निहोत्री यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सरपंच ब्रम्हदंडे, ग्रामपंचायत सदस्य विशाखा राऊत, ग्रामस्थ रवींद्र पवार, संदीप पवार आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com