सुहास देसाई यांचा पिकुळे येथे सन्मान
swt254.jpg
53358
दोडामार्गः पत्रकार सुहास देसाई यांचा सत्कार करताना मोहन गवस व अन्य मान्यवर.
सुहास देसाई यांचा
पिकुळे येथे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २५ : तालुक्यातील विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महामंडळाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या सुहास देसाई यांचा पिकुळे हायस्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुंबई हितवर्धक मंडळाच्यावतीने हा विशेष नागरी सन्मान करण्यात आला.
पिकुळे हायस्कूलमध्ये कानिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले देसाई यांनी प्रशाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लावलेला हातभार, शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी, सामाजिक क्षेत्रातील योगदान याबाबत त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गवस यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, संदीप देसाई, माजी जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी पिकुळे मुंबई हितवर्तक मंडळाचे अध्यक्ष सावळाराम उर्फ बबनराव गवस, सचिव प्रमोद गवस, हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक आंबुलकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

