शिडवणेत ज्येष्ठांशी पोलिसांचा संवाद
swt2510.jpg
53367
शिडवणेः येथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना पोलिस अंमलदार चंद्रकांत माने. (छायाचित्र ः एन. पावसकर)
शिडवणेत ज्येष्ठांशी
पोलिसांचा संवाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ : खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शिडवणे गावात सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे बीट पोलिस अंमलदार चंद्रकांत माने यांनी शिडवणे गावाला भेट देत येथील ज्येष्ठ महिला-पुरुषांशी संवाद साधला.
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिस दल कटिबद्ध असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. सद्याच्या बदलत्या परस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी ज्येष्ठांसाठी भारतीय कायद्यानुसार त्यांचे असलेले हक्क आणि अधिकार याविषयी त्यांना सखोल माहिती पोलिस दलाच्या वतीने देण्यात आली. यावेळी शिडवणे गावातील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

