वासोटा किल्ल्यापर्यंत औरंगजेब कधी पोहचलाच नाही
-rat२५p३०.jpg-
25N53382
चिपळूण ः सह्याद्रीच्या खोऱ्यातील डोंगराच्या माथ्यावर असलेला वासोटा किल्ला.
----
‘वासोटा’पर्यंत औरंगजेब कधी पोहचलाच नाही
समीर कोवळे ः कैद्यांना ठेवण्यासाठी उपयोग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : सह्याद्रीच्या खोऱ्यातील वासोटा किल्ल्याचे सौंदर्य इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना भुरळ घालतो. वनदुर्ग प्रकारात मोडणाऱ्या या किल्ल्यापर्यंत औरंगजेब कधीही पोहचू शकला नाही. ऐतिहासिक पाऊलखुणांची साक्ष देणारा हा किल्ला वनदुर्ग प्रकारात मोडतो. औरंगजेबला या किल्ल्यापर्यंत पोहचता आले नाही. दुर्गअभ्यासक समीर कोवळे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
महाराष्ट्रात असलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास अनोखा आणि समृद्ध आहे. राज्याच्या किल्ल्यांचा इतिहास राज्याच्या धैर्य आणि स्वातंत्र्याच्या प्रतीकांपैकी एक आहे. महाराष्ट्रात वासोटा एक असा किल्ला आहे जिथे औरंगजेब कधीच पोहचू शकला नाही. आजही त्या किल्ल्याचे सौंदर्य अन् इतिहास पर्यंटकांना भुरळ घालते. वासोटा किल्ला घनदाट कोयनेच्या अभयारण्यात वसलेला आहे. या किल्ल्याचा एक विशेष आकर्षण म्हणजे तो वनदुर्ग प्रकारात मोडतो. किल्ल्याचे निर्माण शिलाहारवंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. किल्ल्यावरून कोयना नदी आणि सह्याद्रीच्या डोंगररांगेचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य दिसते, जे पर्यटकांना अत्याधिक भुरळ घालते. याबाबत माहिती देताना वनदुर्ग अभ्यासक समीर कोवळे म्हणाले, इतिहासकार मानतात की, औरंगजेब किल्ल्याच्या आसपास कधीच पोहचू शकला नाही. किल्ल्याच्या रक्षणाची अत्यंत कठोर आणि विचारशील योजना त्याच्या मजबुतीला स्पष्ट करते. किल्ल्यावरून कडेलोट करणे किंवा शत्रूंना फितुरीच्या तंत्राने गडबड करणे हे तेथील संरक्षणासाठी महत्वाचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर तुरूंग म्हणून केला होता. या किल्यावरून पूर्वी परत येणे फार सोपे नव्हते. किल्ल्याच्या चारही बाजूने घनदाट जंगल आहे तसेच वन्यप्राण्यांचा वावर कायम असतो. तेथे अन्नपाण्याची सोय नाही. कैद्यांना या किल्यात बांधून ठेवले जात नव्हते तर खुल्या वातावरणात सोडले जात होते. आपल्याला वासोटा किल्ल्यावर ठेवले जाणार आहे, हे कैद्याला कळल्यानंतरच त्यांना धडकी भरायची. हा किल्ला आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आहे. त्यामुळे येथे पर्यटनाच्या खूप मर्यादा आहेत. सूर्य उगवल्यानंतर आणि सूर्य मावळण्यापूर्वीच या किल्ल्यावरून परतावे लागते. या ठिकाणी कुठेही मुक्काम करता येत नाही.
----
किल्ल्यापर्यंत जाण्याचा मार्ग
चिपळूणमधून तिवरे, रेडघाट, बैलघाट येथून नैसर्गिक मार्ग आहे. खेड तालुक्यतील चोरवणे, नागेश्वर आणि तेथून सह्याद्रीच्या डोंगरधारावरून या किल्ल्यापर्यंत पायी जाता येते. शारीरिक, मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारे पर्यटक या मार्गाचा वापर करतात. साताऱ्यातून जाताना बामणोली गावातील शिवसागर तलाव पार केल्यानंतर घनदाट जंगलातील किल्ल्यापर्यंतचा प्रवास पर्यटकांना एक वेगळा अनुभव देतो.
-------------
कोट
वासोटा किल्ला, जो ट्रेकर्सच्या बकेटलिस्टमध्ये एक महत्त्वाचे स्थान राखतो, हे एक उत्कृष्ट साहसी स्थळ आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ट्रेकिंग अनुभवाची गोडी चाखण्यासाठी आणि त्या ऐतिहासिक महत्त्वाचा अनुभव घेण्यासाठी, वासोटा किल्ल्याला एक आगळे स्थान आहे. किल्ल्याच्या अतिशय दुर्गम ठिकाणी असण्यामुळे किल्ल्यावर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात एक शांतता आणि प्राकृत सौंदर्य आहे, जे सर्वांना खूप मोहक वाटते. या किल्ल्यापर्यंत औरंगजेब कधीही पोहचू शकला नाही.
-समीर कोवळे, वनदुर्ग अभ्यासक, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

