''शरद प्रतिभाशाली'' प्रतिष्ठान तालुकाध्यक्षपदी कृष्णा राऊळ
swt2512.jpg
53383
कृष्णा राऊळ
‘शरद प्रतिभाशाली’ प्रतिष्ठान
तालुकाध्यक्षपदी कृष्णा राऊळ
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २५ः शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी कोलगावचे सुपुत्र तथा ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संगीत विशारद कृष्णा राऊळ यांची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम शेलार, सेक्रेटरी जगदीश मरामगे यांनी ही निवड केली. कृष्णा राऊळ विद्यार्थीदशेपासूनच भजन कलेत कार्यरत आहेत. वडील (कै.) विठू राऊळ यांच्याकडून त्यांना भजनकलेचा वारसा मिळाला.
प्रख्यात भजन सम्राट (कै.) कृष्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भजन कला आत्मसात केली. या कलेचे शास्त्रीय शिक्षण गुरुदास मुंड्ये, चंद्रकांत बोर्डेकर, नीलेश मेस्त्री यांच्याकडून घेतले. भजनसम्राट भालचंद्र केळुसकर यांच्याकडे आजही भजनकलेचे शिक्षण घेत आहेत. सिंधुदुर्गात अनेक संगीत क्लासच्या माध्यमातून ग्रामीण भागात हार्मोनियम वादन व गायन क्षेत्रात कलाकार घडविले आहेत. भजन स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पडत आहेत. भजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी कृष्णा राऊळ यांनी आपल्या या जडणघडणीत गुरुंसह या क्षेत्रांतील सहकारी तसेच संगीत व भजनरसिकांच्या प्रोत्साहनाचा उल्लेख केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

