रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
रेल्वेगाड्यांचे
वेळापत्रक बिघडले
खेड : रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक रविवारी बिघडल्यामुळे विकेंडलाच प्रवाशांची रखडपट्टी झाली. जबलपूर-कोईमतूरला तब्बल ११ तासांचा ‘लेटमार्क’ तर गोव्याच्या दिशेने जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेसही चार तास उशिराने धावली. अन्य रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला होता. शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाचा ओघ सुरूच असल्याने मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या नियमित गाड्या हाऊसफुल्लच धावत आहेत. शनिवारी सायंकाळी ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईला जाणारी मांडवी एक्स्प्रेस पाच तास रखडली होती. हे वेळापत्रक सोमवारी सुरळीत झाले.
---
खेडमध्ये दिव्यांगांना
प्रमाणपत्र वितरित
खेड : पंचायत समितीतर्फे २०२४-२५ सेसअंतर्गत कळंबणी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर (अस्थिव्यंग, अंध, अध्ययन अक्षम) आयोजित करण्यात आले होते. यातील शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खरटमोल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हे शिबिर झाले. शिबिरात १३५ शिबिरार्थींची नोंदणी झाली. अस्थिव्यंग-२१, मतिमंद- १५, दृष्टीदोष-८ असे एकूण ४४ शिबिरार्थींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अस्थिव्यंग-१८, मतिमंद-२८, दृष्टीदोष-६ असे एकूण ५२ जणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
---
बेल्ट ग्रेडिंग
परीक्षा उत्साहात
रत्नागिरी ः ऑल जपान सेकी-काई कराटे-दो इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ए. बी. स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि जिल्हा कराटे-दो असोसिएशनतर्फे बेल्ट ग्रेडिंग परीक्षा मोठ्या उत्साहात झाली. परीक्षेत विविध वयोगटातील कराटेपटूंनी सहभाग घेतला आणि आपले कौशल्य सादर केले. कराटे प्रशिक्षक अरूण बेग यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा झाली. त्यांच्यासोबत सहाय्यक प्रशिक्षक रितेश बेग, तेजस जाधव, प्रथम बेग, रोहित सावंत आणि प्रेम बेग यांनीही मार्गदर्शन केले. स्पर्धेत कराटेपटूंनी उत्कृष्ट कौशल्यांचे प्रदर्शन केले आणि त्यांना पुढील बेल्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. ही परीक्षा जिल्ह्यातील कराटे खेळाडूंसाठी एक उत्तम संधी ठरली असून, त्यांच्या प्रगतीचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

