कुणबी समाज भवनासाठी 50 लाख
कुणबी समाजभवनासाठी ५० लाख
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः तालुक्यातील कुणबी समाजभवनाच्या विस्तारीकरणासाठी ५० लाखांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केला आहे. समाजभवनाला निधी मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते.
कुणबी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी हे भवन उभारण्यात येत आहे. यामध्ये विवाहसोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक मेळावे आयोजित करता येणार आहेत. कुणबी समाजभवनाच्या विस्तारासाठी निधी मंजूर झाल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी आमदार निकम यांचे आभार मानले आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजना कार्यान्वित करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या भव्य समाजभवनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता अंतिम टप्प्यातील प्रक्रिया गतिमान होणार आहे. याबाबत आमदार निकम म्हणाले, सामाजिक सलोखा आणि विकासाची गती हीच आमची खरी बांधिलकी आहे. समाजाच्या हितासाठी काम करणे हे माझे कर्तव्य असून, कुणबी समाजभवनाचे विस्तारीकरण त्याचेच एक प्रतीक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

