दिया मालवणकरचा भाजपतर्फे सत्कार
swt2513.jpg
N53415
वेंगुर्लेः येथे दिया मालवणकरचा भाजपच्यावतीने सत्कार करण्यात आला.
दिया मालवणकरचा
भाजपतर्फे सत्कार
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ः वेंगुर्ले हायस्कूलची विद्यार्थीनी दिया मालवणकर हिने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लांब उडी व उंच उडीमध्ये रौप्य पदक पटकाविले. तिचा भाजपच्यावतीने वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
दिया ही जागृती क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष (कै.) संजय मालवणकर यांची पुतणी आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, वेंगुर्ले उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, मनवेल फर्नांडिस, नगरसेविका साक्षी पेडणेकर, अॅड. प्रकाश बोवलेकर, शिवदत्त सावंत, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व निलेश गवस, बबन आरोलकर, संदेश नार्वेकर, सुरी कुडाळकर, उदय महाजन, छोटू कुबल, नवनाथ सातार्डेकर तसेच जागृती क्रीडा मंडळाचे दिलीप मालवणकर, विवेक राणे, प्रशांत मालवणकर, अमोल सावंत इत्यादी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

