हसनाडी-वेळगिवे येथे 
भाजपमार्फत सौर दिवे

हसनाडी-वेळगिवे येथे भाजपमार्फत सौर दिवे

Published on

53420

हसनाडी-वेळगिवे येथे
भाजपमार्फत सौरदिवे
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ ः देवगड तालुक्यातील हसनाडी-वेळगिवे गावकऱ्यांची रात्री अंधारामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक कार्यकर्ते तथा प्रीमियर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय घरत यांच्या वतीने सोलार दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. भाजप देवगड मंडलाध्यक्ष महेश ऊर्फ बंड्या नारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र लाड, ग्रामपंचायत सदस्य नीलेश नार्वेकर, बाळा सावंत, फणसगाव ग्रामपंचायत सदस्य बाबू आडिवरेकर आदी उपस्थित होते. सोलार दिवे विविध ठिकाणी लावण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यानिमित्त विजय घरत यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com