''पुस्तकांची बॅंक'' उपक्रमाचे सिंधुदुर्नगरीत उद्घाटन

''पुस्तकांची बॅंक'' उपक्रमाचे सिंधुदुर्नगरीत उद्घाटन

Published on

swt2518.jpg
53417
सिंधुदुर्गनगरीः ‘पुस्तकांची बॅंक’ उपक्रमाचे उद्घाटन करताना रवींद्र खेबुडकर व इतर मान्यवर.

‘पुस्तकांची बॅंक’ उपक्रमाचे
सिंधुदुर्गनगरी येथे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ः वित्त विभागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी आणि त्यांना प्रतीक्षा कालावधीत काहीतरी वाचता यावे, या हेतूने वित्त विभागाने सुरू केलेली ‘पुस्तकांची बॅंक उपक्रम’ स्तुत्य असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या वतीने पुस्तकांची बँक सुरू केली आहे. याचा फायदा वित्त विभागात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी होणार आहे. तसेच काही वेळा वित्त विभागात बैठका असतात, व्हिडिओ कॉन्फरन्स असते, त्यावेळी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. यावेळी त्यांना या पुस्तक बँकेचा मोठा फायदा होणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, वित्त विभाग अधिकारी तसेच सामान्य प्रशासनाचे अधिकारी, खातेप्रमुख यांसह वित्त विभाग कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com