-हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य पूर्ण करूया
-rat२५p१८.jpg -
२५N५३३३७
साडवली ः बलिदान मासानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे गुरूजी, दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित शिवप्रेमी.
------
हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य पूर्ण करूया
संभाजी भिडे ः साडवलीतील व्याख्यानाला शिवप्रेमींची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २५ ः हिंदवी स्वराज्यासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे तुकडे झाले तरीही ते नमले नाहीत, झुकले नाहीत. ते झुकले असते तर आज काय परिस्थिती असती? आज आपल्यापैकी अनेकांना छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा पूर्ण इतिहास माहितीही नसेल. जो आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही तो पुढे काय इतिहास घडवणार..? त्यासाठी जागे व्हा.. या उभ्या देशात छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचे विचार पोचवूया. या थोर, पराक्रमी राजांचे हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य सर्वांनी पूर्ण करायचे आहे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी साडवली येथील कार्यक्रमात केले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्ताने सोमवारी (ता. २४) सायंकाळी साडवली येथील बने स्कूलच्या मैदानावर भिडे गुरूजींचे व्याख्यान झाले. यापूर्वी भिडे गुरूजींनी कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिली. त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत अभिवादन केले.
भिडे गुरूजी म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे निर्माते हे छत्रपती शिवाजी महाराज होते. याच स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी २८९ लढाया लढल्या. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे देखील शेवटपर्यंत स्वराज्यासाठी जगले. पाऊणेनऊ वर्षात जवळपास १३४ लढाया छत्रपती संभाजीराजांनी लढल्या. विशेष म्हणजे त्यात त्यांनी एकदाही माघार घेतली नाही. ज्या वेळी छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर कसबा येथे पकडण्यात आले त्या वेळचा प्रसंग भिडे गुरूजी यांनी आपल्या शैलीत मांडला. एकूण उपस्थित शंभूप्रेमींचे डोळे भरून आले. सूत्रसंचालन निबंध कानिटकर, प्रास्ताविक मदन मोडक यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

