सूर्यादयावेळी अनुभवला कासवांचा जन्मोत्सव

सूर्यादयावेळी अनुभवला कासवांचा जन्मोत्सव

Published on

rat२५p३१.jpg-
२५N५३३६४
वेळास : समुद्रकिनारी कासवांच्या पिल्लांना समुद्रात जाताना पाहणारे पर्यटक.
rat२५p३९.jpg-
P२५N५३४१९
वेळास किनाऱ्यावर समुद्राकडे निघालेली कासवाची पिल्ले.
-----
सूर्यादयावेळी अनुभवला कासवांचा जन्मोत्सव
वेळास समुद्रकिनारा; यशतेज फाउंडेशनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २५ ः उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसवे कासवांच्या पिल्लांचा जन्मोत्सव या नैसर्गिक सोहळ्याचे आनंदी क्षण मंडणगड शहरवासियांनी अनुभवले. यशतेज फाउंडेशन मंडणगड यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी मंगळवारी (ता. २५) वेळास येथे ऑलिव्ह रिडेल कासवांचा जन्मसोहळा पाहिला.
वेळास समुद्रीकिनारी हॅचरीत सुरक्षित करण्यात आलेल्या घरट्यामधील अंड्यांतून ३४ पिल्ले बाहेर पडली. त्यांना समुद्रकिनारी सुखरूप सोडण्यात आले. कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांसह कासव या विषयाची सखोल माहिती दिली. पहाटे साडेचार वाजता शहरातून वेळास किनारी दाखल झालेल्या नागरिकांनी सूर्योदयावेळी हा जन्मसोहळा अनुभवला.
कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळास या गावी कासव विणीच्या हंगामास सुरवात झाली आहे. यंदा वेळास येथे समुद्रकिनाऱ्यावर ३२ घरट्यांमध्ये ३ हजार ५७९ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवांची पिल्ले अंड्यातून बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांसाठी अंड्यातून पिल्ले केव्हा बाहेर पडतील याची माहिती स्थानिक व कासवमित्राकडून प्राप्त होत आहे. त्यानुसार वेळास गावात पर्यटक अभ्यासकांची गर्दी वाढत आहे. या पुढील काळात लवकरच कासव महोत्सवाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
---
कासवप्रेमींची गर्दी
कासवांचा जन्मोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने कासवप्रेमींनी वेळास समुद्रकिनारी पहाटेपासून गर्दी केली होती. त्यांनी या नैसर्गिक सोहळ्याचा आनंदी क्षण कुटुंबासोबत अनुभवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com