ध्येयपूर्तीसाठी आत्‍मविश्‍वास महत्‍वाचा

ध्येयपूर्तीसाठी आत्‍मविश्‍वास महत्‍वाचा

Published on

kan251.jpg
53436
शिरवल : येथील फार्मसी कॉलेजमधील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ॲड. उमेश सावंत यांचा सत्‍कार माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.

ध्येयपूर्तीसाठी आत्‍मविश्‍वास महत्‍वाचा
ॲड. उमेश सावंत : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ : शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगावा. स्वतःवर विश्वास असेल तरच कोणत्याही क्षेत्रात यश निश्‍चितपणे मिळते, असे प्रतिपादन ॲड. उमेश सावंत यांनी केले.
तालुक्‍यातील शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. यावेळी ॲड. सावंत बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार वैभव नाईक यांनी केले. तर प्रमुख पाहुणे ॲड. उमेश सावंत यांनी दीपप्रज्‍वलन केले. यावेळी वैभव नाईक यांनी ॲड. उमेश सावंत यांच्या कार्याचा गौरव त्यांचा सत्कार केला. वैभव नाईक यांनी मार्गदर्शन करताना गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमावेळी उद्योजक सुहास गावडे, युवक कल्याण संघ संस्था सचिव डॉ. रमण बाणे, प्रा. मंदार सावंत, मुख्याध्यापक डॉ. राजेश जगताप, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, प्रा. मेघा बाणे, प्रा. डॉ. अमोल उबाळे, प्रा. चंद्रशेखर बाबर, प्रा. अमर कुलकर्णी, प्रा. प्रणाली पांगम, प्रा. स्वरूपा भोकरे, प्रा. प्रीतम राणे, महाविद्यालयाचे स्टुडन्ट कौन्सिल जनरल सेक्रेटरी विवेक परब, महिला सेक्रेटरी आलिया पटेल, कल्चरल सेक्रेटरी प्रणव कोळी, उर्वी दळवी, कशिश काझी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com