टिळक आळीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार सुरू

टिळक आळीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार सुरू

Published on

-rat२५p४०.jpg-
२५N५३४२७
रत्नागिरी : टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ऋग्वेद स्वाहाकार.
-------
ऋग्वेद संहिता स्वाहाकार सुरू
टिळक आळी गणेशोत्सव मंडळ शताब्दी महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त दर महिन्याला सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ऋग्वेद संहिता स्वाहाकार सुरू झाला आहे. त्याची पूर्णाहुती शुक्रवारी (ता. २८) होणार आहे.
हा स्वाहाकार सिंधुदुर्गातील ज्येष्ठ वेदमूर्ती मुरवणे गुरूजी व त्यांचे घनपाठी विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. दररोज सकाळी ७ ते २ या वेळेत हा स्वाहाकार चालतो व संध्याकाळी ७ वाजता आरती होते. या ऋग्वेदीय स्वाहाकारामुळे सर्वांच्या कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे या स्वाहाकारामुळे अपमृत्यू टाळता येतो, पूर्ण आयुष्य लाभ, मानसिक स्वास्थ्य, आजारपणापासून मुक्तता, सार्वत्रिक उत्तम आयुरारोग्य, संतती वृद्धी याकरिता स्वाहाकाराचे आयोजन केले आहे. शतक महोत्सवानिमित्त पारावर होणाऱ्या या संहिता स्वाहाकार कालावधीत घुमटीतील देवतांवर दुर्वा, बेल, तुळस, फुलं, जल यांचा अभिषेक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com