अमली पदार्थ कारवाईसाठी समुद्रकिनारी गस्त घाला
-rat२५p२९.jpg-
२५N५३३५४
रत्नागिरी ः जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह. शेजारी धनंजय कुलकर्णी, शंकर बर्गे, चंद्रकांत सूर्यवंशी.
----------
अमली पदार्थावरील कारवाईसाठी गस्त घाला
जिल्हाधिकारी सिंह; परदेशी नौकांची तपासणी करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः अमली पदार्थविरोधी कारवाई तीव्र करण्यासाठी कस्टम, उत्पादन शुल्क, कोस्ट गार्ड, पोलिस आदींनी समुद्रकिनारी नियमित गस्त घालावी. जेटीवर येणाऱ्या परदेशी नौकांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. तसेच रत्नागिरीत व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करा, अशाही सूचना त्यांनी दिली. नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून अहवाल सादर करावा. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बंद असणाऱ्या कंपन्यांबाबत तपासणी करून अहवाल द्यावा. अन्न व औषध विभागाने रात्रीच्यावेळी सुरू असणाऱ्या मेडिकल दुकानांना भेट देऊन तपासणी अहवाल सादर करावा. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारे तडीपारीचे प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावेत. सर्व विभागांनी गंभीरपणे अमली पदार्थविरोधी मोहीम हाती घेऊन कार्यवाही करावी.
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, नेपाळी खलाशांमध्ये अमली पदार्थांचा वापर होतो. त्यामुळे बंदर अधिकाऱ्यांनी दक्ष राहून तपासणी करावी. पोलिस विभागाकडील श्वान त्यासाठी घ्यावा. त्याबाबत पोलिसांना कळवावे. कस्टम विभागाने बंदरांवर येणाऱ्या नौकांवरील (विशेषतः परदेशी) साहित्यांची तपासणी करावी. पोलिस विभागाला माहिती देऊन संयुक्त कारवाई करावी. २४ तास सुरू असणाऱ्या मेडिकल दुकानांबाबतही एफडीएने लक्ष ठेवावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

