जीजीपीएसमध्ये जादूचे प्रयोग

जीजीपीएसमध्ये जादूचे प्रयोग

Published on

‘जीजीपीएस’मध्ये
जादूचे प्रयोग

रत्नागिरी ः मुलांच्या विस्तारित कल्पनाशक्तीमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे जादू. मुलांच्या डोक्यातील जादूची कल्पना जेव्हा प्रत्यक्षात समोर दिसते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आगळाच. मुलांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी येथील जीजीपीएसच्या ''स्वामी स्वरूपानंद प्री-प्रायमरी विभागातर्फे'' जादूगार विनयराज'' यांचे जादूचा प्रयोग सादर केले. मुलांनी जादूच्या प्रयोगांचा मनमुराद आस्वाद घेतला. असेच विविध उपक्रम वर्षभरात शाळेने मुलांसाठी राबवले ज्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा झाला.
--
विज्ञानशिक्षक मंडळाचे
उद्बोधन वर्ग
राजापूर ः माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी, जेएसडब्ल्यू फाउंडेशन जयगड व रत्नागिरी जिल्हा विज्ञानशिक्षक मंडळ यांच्यावतीने रत्नागिरी येथे नुकताच उद्बोधन वर्ग झाला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी संशोधन करून त्या संशोधनासंबंधी कशाप्रकारे पेटंट मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले. विज्ञानरंजन स्पर्धेसह अन्य विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या वेळी जेएसडब्ल्यूच्या सीएसआरचे हेड अनिल दधिच, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, कार्यवाह सुभाष सोकासणे, उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी आदी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हास्तरीय विज्ञानरंजन स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना गौरवण्यात आले.
---
धामापूर जांगलदेव
मंदिराचा जीर्णोद्धार
सावर्डे ः संगमेश्वर तालुक्यातील धामापूर रामणवाडी येथील जांगलदेव मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम उत्साहात झाला. नवीन जांगलदेवाच्या मूर्तींचे आगमन व कळसाची मिरवणूक माखजन ते रामणवाडीपर्यंत काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात रंगांची व फुलांची उधळण करण्यात आली. मंदिर शुद्धीकरण वास्तूशांती मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कळशारोहण सोहळा व उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा व हळदीकुंकू समारंभ झाला. सायंकाळी मान्यवरांचे सत्कार व महाप्रसाद झाला. रात्री नवज्योत उत्साही मंडळाचे भजन झाले. यानंतर नवसरी देवीच्या पालखी आगमनाचा सोहळा झाला. रात्री साडेदहा वाजता रामणवाडीतील स्थानिक कलाकारांचे बहुरंगी नमन झाले.
---
मंडणगड लोकअदालतीत
१९८ प्रकरणे निकाली
मंडणगड ः तालुका विधी सेवा समिती, दापोलीअंतर्गत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मंडणगड येथे राष्ट्रीय लोकअदालत झाली. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मंडणगड एम. ए. शिंदे यांनी पॅनल प्रमुख म्हणून आणि ॲड. एस. बी. जाधव यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. लोकअदालतीमध्ये वादपूर्व १२१७ प्रकरणे तसेच प्रलंबित असणारी १४० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १५ प्रलंबित असणारी प्रकरणे व १९८ वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये २५ लाख ४५ हजार ९०७ रुपयांची वसुली करण्यात आली.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com