ई कोर्टचे एक दिवसीय प्रशिक्षण

ई कोर्टचे एक दिवसीय प्रशिक्षण

Published on

-rat२५p४१.jpg-
२५N५३४३८
रत्नागिरी : जिल्हा न्यायालयात ई-कोर्टविषयक प्रशिक्षणावेळी बोलताना जिल्हा न्यायाधीश (क्र. १) अनिलकुमार अंबाळकर. सोबत अॅड. रत्नदीप चाचले, अॅड. निनाद शिंदे.
----
वकील, लिपिकांना ई-कोर्टचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र न्यायिक प्रशिक्षण संस्था (भाईंदर, ठाणे) यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत ईसीटी ७ चे ई-कोर्ट प्रोग्रामचे एकदिवसीय प्रशिक्षण वकील व लिपिकांना दिले. जिल्हा न्यायालयात हे प्रशिक्षण झाले. कार्यक्रमाचे उद्‍घाटन रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश (क्र. १) अनिलकुमार अंबाळकर यांनी केले. या प्रसंगी रत्नागिरी बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. निनाद शिंदे, सचिव अॅड. रत्नदीप चाचले उपस्थित होते. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अॅड. आयुधा देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात रत्नागिरी बार असोसिएशनचे वकील, लिपिक यांच्यासह ज्येष्ठ वकील पुष्पराज शेट्ये, अॅड. पोतनीस, अॅड. शिवलकर, अॅड. गौरव देसाई आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com