-सावर्डेत येणारे 85 हजाराचे खैराचे लाकूड जप्त

-सावर्डेत येणारे 85 हजाराचे खैराचे लाकूड जप्त

Published on

खैराचे ८५ हजार किमंतीचे लाकूड जप्त
पोलादपूरमध्ये कारवाई ; ट्रकसह चालक ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथून सावर्डेच्या दिशेने होणारी खैराची अवैध वाहतूक रायगड जिल्ह्यातील पोलादपूर वन उपनाक्यावर वनविभागाने नुकतीच रोखली. या कारवाईत वनविभागाने ८५ हजारांचे खैर लाकूड जप्त केले आहे. या खैराची वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रकचालकालाही वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
गुफरान ईरफान अहमद (रा. ऐनी हातीनसी, उत्तरप्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारे रोहा उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव, सहाय्यक वनसंरक्षक रोहित चौबे, वनक्षेत्रपाल विकास भामरे, महाडचे वनक्षेत्रपाल राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर वनउपज तपासणीनाका येथे वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सावर्डेच्या (ता. चिपळूण) दिशेने जाणारा ट्रकमध्ये ६.८०५ घनमीटरचे ३५४ खैर सोलीव तुकडे मिळाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकचालकाकडे याबाबत चौकशी केली असता खैर वाहतुकीचा कोणताही परवाना चालकाकडे नव्हता. या मालाची अंदाजे किंमत ८५ हजार २०५ रुपये इतकी आहे. वनविभागाने खैर लाकडासह ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलादपूर वनपाल परिमंडळाचे वनाधिकारी बाजीराव पवार, पोलादपूर तपासणीनाका वनरक्षक जयवंत वाघमारे, गोविंद खेडकर, देवीदास त्रिभुवन, करंजे वनरक्षक नवनाथ मेटकरी, पोलादपूर वनरक्षक संदीप परदेशी, कोतवाल वनरक्षक अमोल रोकडे, देवळे वनरक्षक भीमराव गायकवाड यांनी सहभाग घेऊन धडक कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com