-गुरुवारपासून होणार वाहनांची नवीन मालिका सुरू

-गुरुवारपासून होणार वाहनांची नवीन मालिका सुरू

Published on

वाहनांची नवीन मालिका गुरुवारी सुरू
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय; शुल्क भरून पसंती क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका एमएच-०८-बीएच-०००१ ते एमएच-०८ बीएच-९९९९ गुरुवारपासून (ता. २७) सुरू करण्यात येणार आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याचवेळा नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक सुलभतेने मिळावा यासाठी ज्या दुचाकी/चारचाकी / परिवहन वाहनमालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी तिप्पट शुल्क भरून तो घ्यावा. त्यासाठी २७ मार्च कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी २ वाजता अर्ज करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहनांची यादी २७ मार्च सायंकाळी ४ वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीमधील एकाच क्रमांकासाठी दोन किंवा जास्त अर्ज असल्यास यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी २८ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. दुचाकी वाहनांची यादी त्याचदिवशी सायंकाळी ४ वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीमधील एकाच क्रमांकासाठी दोन किंवा जास्त अर्ज असल्यास दुचाकी अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी २९ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता लिफाफे उघडून नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. याबाबत अधिक माहितीसाठी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com