दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान

दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान

Published on

-rat२५p४३.jpg-
P२५N५३४५९
रत्नागिरी : निवृत्त तरी कार्यरत समुहातर्फे मातृप्रेरणा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
------
‘निवृत्त तरी कार्यरत’तर्फे मातृप्रेरणा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : येथील निवृत्त तरी कार्यरत समुहार्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मातांना मातृप्रेरणा सन्मान देऊन गौरविण्यात आले. हा उपक्रम येथील कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात झाला.
मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी या निवृत्त तरी कार्यरत समुहाच्या विविध उपक्रमांविषयी गौरवोद्गार काढले तसेच विद्यालयाला या उपक्रमाचा भाग होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. निवृत्त तरी कार्यरत समुहाच्या सदस्या दामले यांनी सन्मानित करण्यात येणाऱ्या मातांची निवड कशा प्रकारे केली, या मातांचा सन्मान का करायचे ठरवले ही संकल्पना स्पष्ट करून सांगितली. यानंतर आविष्कार शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे व रजपूत यांनी माता पालकांविषयी माहिती दिली.
आविष्कार शाळेतील मेहुल लोहार या विद्यार्थ्याची आई लता लोहार, आविष्कार संस्थेच्या कार्यशाळेतील विद्यार्थिनी दिया जाधव हिची आई शिल्पा जाधव आणि मूकबधीर शाळेतील विद्यार्थिनी साक्षी पेढे हिची आई सुरेखा पेढे व झोया भाटकर हिची आई साजिया भाटकर यांना पुरस्कार देण्यात आला. या मातृशक्तीने शाळा व संस्था व शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मिळालेल्या सन्मानाबद्दल निवृत्त तरी कार्यरत समुहाच्या सर्व सदस्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं; परंतु त्याचबरोबर ती सुसंस्कारीत होतील आणि प्रथम राष्ट्र, समाज आणि कुटुंबासाठी योग्य तऱ्हेने सहकार्याचा हात सर्वत्र देतील, असे पालकांनी लक्षात घ्यावे, असा छोटासा संदेश सुखिता भावे यांनी समुहाच्यावतीने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com