कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करा
-rat२५p४५.jpg -
२५N५३४६१
राजापूर : पोलिस निरीक्षक अमित यादव यांना निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले आणि सहकारी.
--------------
कुणाल कामरा यांच्यावर कारवाई करा
राजापूर शिवसेनेची मागणी ; पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ : राजापूर शिवसेनेच्यावतीने स्टॅण्डअप् कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे केली आहे.
स्टॅण्डअप् कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई येथील कॉमेडियन शोदरम्यान शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका गाण्याद्वारे आक्षेपार्ह शब्द वापरून जी बदनामी केली आहे त्यामुळे आम्हा शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. कामरा याने केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही शिवसैनिक जाहीर निषेध व्यक्त करतो. तसेच आमच्या नेत्याच्या बदनामीविरोधात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून कायदेशीर तक्रार करत आहोत असे निवेदनात नमूद केले आहे. या वेळी तालुकाप्रमुख दीपक नागले, विभागप्रमुख जितेंद्र तुळसवडेकर, उपसरपंच संतोष तांबे, महिला शहरप्रमुख हर्षदा खानविलकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

