महाविद्यालयीन समन्वयक पुरस्कार प्रा. धुरींना प्रदान

महाविद्यालयीन समन्वयक पुरस्कार प्रा. धुरींना प्रदान

Published on

swt2528.jpg
53462
सावंतवाडीः प्रा. नीलम धुरी यांचा सत्कार करताना शुभदादेवी भोसले. बाजूला सदासेन सावंत, मितल धुरी आदी.

महाविद्यालयीन समन्वयक
पुरस्कार प्रा. धुरींना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्यावतीने सुरू असलेल्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २०२४-२५ मध्ये येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नीलम धुरी यांना सिंधुदुर्ग उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालयीन समन्वयक म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे करिअर कट्टा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावंतवाडी राजवाडा येथे सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेच्या वतीने प्रा. धुरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्ष शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असून, विद्यार्थ्यांच्या करिअर आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमातून विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर संधी उपलब्ध होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com