मुणगे बायची देवी मंदिरात आज कलशारोहण सोहळा
swt2530.jpg
53494
मुणगेः येथील देवी बायची मंदिराचा कलश मंदिरामध्ये नेताना देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये. बाजूला निषाद परुळेकर व इतर. (छायाचित्र ः विष्णू मुणगेकर )
मुणगे बायची देवी मंदिरात
आज कलशारोहण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. २५ ः येथील देवी बायची मंदिराचा कलशारोहण सोहळा उद्या (ता. २६) होणार आहे. पीठाधीश श्रीमत् दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते होणार कलशाची स्थापना करण्यात येणार आहे. मुणगे ग्रामदेवता देवी भगवती देवस्थानच्या वतीने बांबरवाडी येथील देवी बायची (पूर्वमर्यादा) मंदिराचा जीर्णोध्दार करून नवीन स्वरुपात मंदिर बांधण्यात आले आहे.
हे मंदिर भगवती मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. देवी भगवतीप्रमाणेच देवी बायची भक्ताच्या नवसाला पावणारी आणि भक्ताच्या संकटामध्ये धावून जाणारी देवी म्हणून ख्याती आहे. मंदिरात पाषाण स्वयंभू आहे. भगवती मंदिर येथून ढोलताश्यांच्या गजरात मिरवणुकीने सोमवारी (ता. २४) कलश बायची मंदिरात आणण्यात आला. कलशारोहणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवी भगवती देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

