देवगड नगरपंचायतीचा वर्धापन दिन उत्साहात

देवगड नगरपंचायतीचा वर्धापन दिन उत्साहात

Published on

swt2534.jpg
53502
जामसंडे : नगरपंचायतीचा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला. (छायाचित्र : संतोष कुळकर्णी)

देवगड नगरपंचायतीचा वर्धापन दिन उत्साहात
केक कापून आनंद व्यक्तः नगरसेवक, कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ : देवगड जामसंडे नगरपंचायतीचा वर्धापन दिन सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. नगरसेवक आणि कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून बहार आणली. केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.
जामसंडे येथील सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी सूरज कांबळे, अन्य नगरसेवक तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, रुचाली पाटकर, माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी, नगरसेवक विशाल मांजरेकर यांच्यासह विवेक खोत, सुजित भुसारे, नीलेश बांदिवडेकर, राजदीप कदम, गुरू अदम, मनीष मोंडकर, सुनील कदम तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी गीते सादर करण्यात आली. मनोरंजनाचे खेळ झाले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, योगेश चांदोस्कर, माजी नगरसेविका हर्षा ठाकूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश बांदिवडेकर, शिवप्रसाद गावकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com